माझ्या वैयक्तिक संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे !!!

Pages

Content

माझ्याविषयी

नमस्कार,
मी हार्दिक सुतारी, माझी स्वतःबद्दल ओळख करून द्यावी इतका मी मोठा नाही. पण आयुष्यात मोठे व्हायचे स्वप्न इतर सर्व सामान्य माणसाप्रमाणे माझेही आहे.  
मी ब्लॉगर तसेच वेबसाइट डेव्हलपर आहे. म्हणजेच वेबसाइट बनवितो. (Work For Google )
नुकतेच माझे एयरक्राफ्ट इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाले.पण मी माझ्या  लहानपणापासूनच ठरवले होते की  समाजकार्य करावे म्हणूनच www.majhinaukri.in या शासकीय नोकरीबद्दल माहिती देणार्‍या  संकेतस्थळाची निर्मिती केली .विशेष म्हणजे या संकेतस्थळाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय . 

    माझा जन्म डहाणू तालुक्यातील 'वाढवण' या अतिशय दुर्घमभागात  झाला. लहानपणी आमच्या शाळेतील बाईंनी (वर्ग शिक्षिका) वर्गात प्रश्न विचारला होता की तुम्ही मोठे होऊन काय बनणार?  या प्रश्नावर कसलाच विचार न करता मी  उत्तर दिले " बाई मला इंजीनियर व्हायचे आहे. त्याच  क्षणापासून  मी निश्चय केला; की मी इंजीनियर होणारच ,म्हणून  प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याला गेलो. तिथे एयरक्राफ्ट इंजिनिअरिंग पूर्ण केले . 
     इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात असताना वडिलांकडे हट्ट करून लॅपटॉप मागितला . अन त्याच  क्षणापासून कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर बद्दल  गोडी निर्माण झाली .  कॉलेजच्या सुट्टीच्या दिवशी माझे सगळे मित्र फिरायला जायचे पण मी मात्र लॅपटॉप घेऊन बसायचो . काही तरी नवीन शोधत बसायचो . 

  पूर्वीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने सतत इतरांना काहीतरी सांगत राहायचे व आपले ज्ञान वाटत राहायचे हेच करत आलो.  इतरांना मदत करण्यात मला जो आनंद मिळतो तो  मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.  

शैक्षणिक माहिती :  
शिक्षण शाळा /कॉलेज
इयत्ता ०१ ली ते ०४ थी जि.प.शाळा टिघरेपाडा (वाढवण)
इयत्ता ०५ वी ते १० वी के.अ.राऊत विद्यामंदिर, (वरोर)
इयत्ता ११वी व १२वी (विज्ञान शाखा) M.K ज्युनिअर कॉलेज (चिंचणी)
AME (Aircraft Maintenance Engineering) IIAE Pune (पुणे)




असो. तुम्हाला कंटाळा आला असेल वाचून, साहजिकच आहे. मी असतो तर वाचलेच नसते.

एक महत्त्वाचे सांगायचे राहिलेच ते म्हणजे माझीनोकरी.इन  प्रमाणे भविष्यामध्ये अशा बर्‍याच निरनिराळ्या चांगल्या वेबसाइट बनविण्याच्या कामाला मी कधीच सुरवात केली आहे. आशा आहे की आपले आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतील.

धन्यवाद.